हैद्राबाद सामूहिक बलात्कार -हत्या प्रकरण : “जसे त्यांनी पीडितेला जिवंत जाळले तसे या प्रकरणातील आरोपींनाही जाळून टाका” , आरोपीच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

Advertisements
Advertisements
Spread the love

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरला सामूहिक बलात्कार करून जाळल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपींना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, त्यांच्या मुलांनी हे केलं असेल तर त्यांना लगेच फाशी द्या किंवा त्यांनी जसे मुलीला जाळले तसेच यांनाही जिवंत जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या आईने दिली आहे.

Advertisements

दरम्यान, न्यायालयाने चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लोकांमधील संताप आणि होत असलेले निदर्शने यामुळे आरोपींना न्यायालयात नेता आलं नाही. त्यामुळे आरोपींना पोलिस स्टेशनमधून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयसमोर हजर करण्यात आले.

Advertisements
Advertisements

या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी सी चेन्नाकेशावुलुची आई श्यामला यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलाताना सांगितलं की, माझ्या मुलालाही फाशीची शिक्षा द्या किंवा जाळा. जसं त्यांनी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर केलं तेच त्यांच्यासोबत करा. मलाही एक मुलगी आहे आणि मी त्या कुटुंबाच्या वेदना, दु:ख समजू शकते. मुलीच्या घरच्या लोकांवर आता काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पना करू शकते. जर मी माझ्या मुलाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर लोक माझ्यावर थुंकतील.

पत्रकारांशी बोलताना श्यामला यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळी जेव्हा पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी नेलं तेव्हा पती या त्रासाने घरातून बाहेर गेले. चेन्नाकेशावुलुचं ५ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्याच्या पसंतीने लग्न लावून दिलं होतं. किडनीच्या विकाराने ग्रस्त आहे त्यामुळे कधीच त्याच्यावर दबाव टाकला नाही. दर सहा महिन्यांनी त्याला रुग्णालयात घेऊन जात होतो.

 

आपलं सरकार