Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर

Spread the love

 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या  २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे , विदर्भ, लातूर, जळगाव आणि नगरमधील जागांचा या यादीत समावेश आहे. एमएमआयने औरंगाबाद आणि सोलापूरमधील त्यांच्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचितच्या या पहिल्या यादीत औरंगाबाद आणि सोलापूरमधील जागांचा समावेश करण्यात आलेला नसल्याने वंचित आणि एमआयएम दरम्यान आघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

वंचितने पहिल्या यादीत ढीवर, नंदीवाले, काची-राजपूत, छप्परबंद, माना, पटवे-मुस्लिम, माडिया, मनियार आणि भिल्ला आदी वंचित समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत दोन डॉक्टरांचा समावेश आहे. दरम्यान, या यादीत औरंगाबाद आणि सोलापूरच्या जागांचा उल्लेख नसल्याने एमआयएम आणि वंचितच्या आघाडीची शक्यता बळावली आहे.

कुटुंबशाही आणि एका जातीच्या थैलीशहांच्या भ्रष्ट राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढून इथल्या राज्यकारभारात लोकशाही व समता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. हे आव्हान स्वीकारून महाराष्ट्रातील मागील लोकसभा निवडणूकीत निवडणूक प्रक्रियेमध्ये सामाजिक लोकशाही आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अतिशय अभिनव व धाडसी पाऊल टकले. गेल्या ७० वर्षात ज्यांना संधी पासून वंचित ठेवले अशा अलुतेदार, बलुतेदार

, कारागीर अल्प लोकसंख्या असलेल्या समाजातील गरीब असले तरी गुणवान असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली याचा सामाजिक परिणाम झाला . या उद्योजक व कारागीर समाजाची आजपर्यंत कोंडून ठेवलेली प्रचंड ऊर्जा महाराष्ट्राच्या समाजकारणात मोकळी होत आहे. विविध सामाजिक गटातील सौहार्द व बंधुभाव वाढला आहे. राजकीय आकांक्षा जागृत होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रदेशात मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भेटताना याचा अनुभव आला, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!