Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केवळ ४० रुपयाच्या वादातून नेट कॅफे मालकाचा खून

Spread the love

केवळ ४० रुपयांच्या बिलावरून ग्राहकाने नेट कॅफे मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी रात्री उस्मानाबाद शहरातील एन्जॉय नेट कॅफेमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर फरार झालेला आरोपी ग्राहक स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दशरथ गेमा पवार (वय-३६, रा. घाटगरी, ता.उस्मानाबाद) हा मागील काही वर्षांपासून उस्मानाबाद शहरात एन्जॉय नेट कॅफे चालवत होता. आरोपी विनोद लंगळे हा काही इंटरनेटवर काही कामानिमित्त आला होता. त्याने इंटरनेटचा वापरही केला. पण नेट कॅफेचे ४० रुपयांचे बिल देण्यास आरोपीने नकार दिला. त्यावरून कॅफे मालक दशरथ पवार व ग्राहक विनोद लंगळे यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, विनोद लंगळे याने दशरथ पवार यांच्यावर हल्ला केला. आरोपीने दशरथ पवार यांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. छातीवर मार लागल्याने दशरथ पवार हे बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.

घटनेनंतर आरोपी विनोद लंगळे झाला होता. मात्र, काही तासांत आरोपीने स्वत:सा पोलिसांच्या हवाले केले. आरोपी विनोद लंगळे यास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!