Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mob Lynching : विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र , कठोर पावले उचलण्याची मागणी

Spread the love

देशभरात मॉब लिंचिंग आणि ‘जय श्रीराम’चा नारा दिला नाही म्हणून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरून विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या पत्रावर रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा आदींच्या सह्या आहेत.

लोकांना ‘जय श्रीराम’च्या नावाखाली चिथावणी दिली जात आहे. दलित, मुस्लीम आणि वंचित समाजातील लोकांना मारहाण करून ठार मारलं जात आहे. या घटना रोखण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचलण्यात यावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मोदींकडे केली आहे.

मुस्लीम, दलित आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना मारहाण करून ठार मारलं जात आहे. या घटना तात्काळ रोखल्या पाहिजेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहून आम्हाला धक्का बसला आहे. २०१६मध्ये दलितांविरोधात हिंसाचाराच्या ८४० घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांमधील दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘तुम्ही संसदेत मॉब लिंचिंगच्या घटनांचा निषेध नोंदवला होता. पण तेवढं पुरेसे नाही,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!