Aurangabad Crime : वृध्द महिलेस दोन भामट्यांनी भरदिवसा लुटले, सेव्हनहिल पुलाजवळील घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या वृध्द महिलेस दोन भामट्यांनी लुटल्याची घटना बुधवारी (दि.१०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा अत्यंत वर्दळीच्या सेव्हनहिल पुलाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसयाबाई शिंदे (वय ५८, रा.सिंदोन-भिंदोन) या पिसादेवी येथे राहणाNया नातेवाईकांना भेटण्यासाठी बुधवारी दुपारी शहरात आल्या होत्या. सेव्हनहिल येथून पिसादेवीकडे जाणा-या रिक्षाची वाट पाहत त्या उभ्या असतांना दोन भामटे त्यांच्याजवळ आले. भामट्यांनी आजी तुम्हाला कोठे जायचे आहे अशी विचारणा केली, अनुसयाबाई शिंदे यांनी पिसादेवी येथे जायचे आहे असे सांगितल्यावर पिसादेवीकडे जाणारी रिक्षा पलिकडे लागते, तुम्हाला तिकडे सोडतो असे म्हणत भामट्यांनी त्यांना काही आंतर पायी चालत नेले. अनुसयाबाई शिंदे यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

Advertisements
Advertisements

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे , गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अनुसयाबाई शिंदे यांनी सांगितलेल्या वर्णणाप्रमाणे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार