It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

“त्या” शिक्षिकेची आत्महत्या शालेय पोषण आहाराच्या पैशामुळे होत असलेल्या छळातून , दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

श्रीरामपूर नगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापिका अलकनंदा सोनवणे आत्महत्येप्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका शिक्षकाला अटक केली आहे. तर दुसरा फरार आहे. सरकारकडून मिळणाऱ्या पोषण आहाराच्या पैशावरून या दोन्ही शिक्षकांनी छळ केल्यामुळे शिक्षिकेने आत्महत्या केली, असे चौकशीत आढळून आले आहे. अलकनंदा सोनवणे या श्रीरामपूर नगरपालिकेच्या गोंधवणी येथील क्रमांक ३ या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचेकडेच मुख्याध्यापक पदाचा पदभार होता.

राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पोषण आहाराच्या पैशावरून विजय शेळके आणि शिवाजी भालेराव हे दोन शिक्षक या शिक्षिकेला सातत्याने छळत होते. त्याला कंटाळून अलकनंदा सोनवणे या शिक्षिकेने दोन दिवसांपूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. आत्महत्या ग्रस्त शिक्षिकेच्या वडिलांच्या फिर्यादी वरून श्रीरामपूर पोलसांनी दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बहिरट यांनी विजय शेळके या शिक्षकाला आज अटक केली. तर दुसरा शिक्षक शिवाजी भालेराव अटकेच्या भीतीने फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

Advertisements


Advertisements

शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार करता यावा यासाठी खोटे रेकोर्ड तयार करण्यासाठी सतत दबाव होता. मात्र आत्महत्या केलेल्या शिक्षिकेने खोटे रेकॉर्ड करण्यास स्पष्ट नकार दिल्याने तिचा सतत छळ करण्यात येत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात शिक्षका बरोबरच नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी होते का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

विविधा