राहुल, तुमचे वडील मि.क्लिन म्हणायचे पण त्यांचा काळ नंबर वन भ्रष्टाचारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परस्परांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. चौकीदार चोर है अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना दिसत आहेत. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Advertisements

तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे नरेंद्र मोदी बोलत होते. राफेल कराराच्या मुद्यावरून राहुल गांधी चौकीदार चोर है अशा शब्दात नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यानंतर मोदींनी राहुल गांधींना हे उत्तर दिलं आहे.

Advertisements
Advertisements

यावेळी नरेंद्र मोदी यांनी बोफर्स घोटाळ्याची देखील आठवण केली. 1980मध्ये राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काळात बोफर्स घोटाळा झाला. त्यानंतर काँग्रेसला सत्तेत येणं देखील कठिण झालं होतं. अशी आठवण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत काँग्रेसवर टीका केली. तसेच, देशाच्या विकासात व्यक्ती म्हणून गांधी घराणं कोणतंही योगदान देत नसल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

आपलं सरकार