Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

साखळी बाॅम्ब स्फोटांनी श्रीलंका हादरली :१५६ हून अधिक ठार, ३०० जखमी

Spread the love

ईस्टर संडेच्या पवित्र दिनीच चर्चवर हल्ला करण्यात आला. एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही हल्ला झाल्याची माहिती समजते.कोलंबोतील शांगरीला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ सहा स्फोट झाले आहेत. ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटांमधील मृत्यूचा आकडा  १५६ वर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर ३०० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत्यूमध्ये ३५ विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली घडली. एएफपीच्या वृत्तानुसार, कोलंबोमध्ये ४५, नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये ६७ आणि  बाट्टिकालोआमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजधानीच्या कोलंबो शहरात पुन्हा एक आठवा बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी शहरात रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोलंबोत आणखी एक स्फोट झाला असून त्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्फोटानंतर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी शोक व्यक्त केला असून जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पहिला स्फोट कोलंबो येथील सेंट अँटनी चर्च, दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये , तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रँड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.

बॉम्बस्फोटाबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करत भारतीय उच्चायुक्तांशी सतत संपर्कात असून, परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!