Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Ayodhya Case: अयोध्या प्रकरणातील मध्यस्थीबाबत उद्या सुनावणी

Spread the love

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर मैत्रिपूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून सूचवण्यात आलेल्या मध्यस्थीच्या पर्यायावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार आहे. अयोध्या वादाबाबत दोन्ही पक्षांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचा पर्याय सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी दिला होता. वादग्रस्त भूमिच्या तोडग्याबाबत एक टक्का जरी शक्यता असली, तरी त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. अयोध्या वादाबाबत दोन्ही पक्षांनी आपापले मत न्यायालयासमोर मांडावे, असे न्यायालयाने सांगितले आणि न्यायालयाकडून नियुक्त केलेल्या मध्यस्थाकडे हे प्रकरण द्यायचे की नाही, यावरील निकाल राखून ठेवण्यात आला.
हा वाद सोडवण्यासाठी न्यायालयाकडून नियुक्त मध्यस्थ नेमण्याचा पर्याय मान्य असल्याचे काही मुस्लिम पक्षकारांनी सांगितले. मात्र, यापूर्वीही अनेकदा मध्यस्थीची प्रक्रिया निष्फळ ठरली आहे, असा आक्षेप रामलल्ला विराजमान यांच्यासह काही हिंदू पक्षकारांनी घेतला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत यापूर्वीदेखील मध्यस्थीचे प्रयत्न झाले असून ते अयशस्वी झाल्याचे मुस्लिम पक्षांतर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सांगितले. न्यायालयाकडून आलेली सूचना महत्त्वाची असून, आम्हाला मान्य आहे. मात्र, मध्यस्थीसाठी न्यायालयाने ठराविक कालमर्यादा निश्चित करून द्यावी, असेही धवन म्हणाले. रामलल्लाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथ यांनी आम्ही मध्यस्थीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. यापूर्वीच्या मध्यस्थीमध्ये भगवान राम यांचा जन्म अयोध्येत झाले होता हे मान्य करण्यात आले होते. मध्यस्थीचे प्रयत्न एकदा नव्हे, तर अनेकदा झाले, असे वैद्यनाथ म्हणाले. एका पक्षातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रणजीतकुमार यांनी मध्यस्थीचे प्रकार यापूर्वी यशस्वी झाले नसल्याचे सांगितले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे प्रत्येकाला वाटते, असे कुमार म्हणाले. दरम्यान, दोन्ही पक्ष उद्या न्यायालयात काय बाजू मांडतात आणि न्यायालय त्यावर काय निकाल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!