Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ind vs aus ऑस्ट्रेलियावर भारताची ६ गडी राखून मात

Spread the love

भारताने महेंद्र सिंह धोनी आणि केदार जाधव यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टी-२० चं उट्टं काढलं. मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. टी-२० त नसलेल्या केदारने वनडेतल्या कमबॅकमध्ये धमाका केला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ५० धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल, स्टॉइनीस, अॅलेक्स कॅरे यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी २३७ धावांचं आव्हान ठेवलं. मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि बुमराहने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर केदार जाधवने १ विकेट घेतली.

सात षटकांत ३१ धावा देऊन १ विकेट घेणाऱ्या केदारने फलंदाजीतही कमाल केली. त्याने ९ चौकार आणि एका षटकारासह ८७ चेंडूत ८१ धावा ठोकल्या. त्याला एम. एस. धोनीनेही चांगली साथ दिली. धोनीने ७२ चेंडूत ५९ धावा केल्या आणि दोघांनीही फिनीशरची भूमिका चोख वठवली. तत्पूर्वी डावाच्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि विराटची भागीदारीही चांगली रंगली. शिखर धवनने मात्र निराशा केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!