Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : योगी सरकारमध्ये आहेत हनुमानाचे वंशज !!

Spread the love

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी स्वत:ला भगवान हनुमान यांचे वंशज असल्याचा दावा केला आहे. मी हनुमानांचा वंशज असल्यानेच सपा आणि बसपा माझ्याशी आघाडी करत आहेत. पण मी भाजपाबरोबरच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सपा व बसपाने आपल्या कार्यकाळात ओबीसी आणि दलित समाजातील लोकांना लुटले आहे, असा आरोप केला. तसेच काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, राजभर वाराणसी येथील आपल्या पक्षाद्वारे आयोजित ‘अति मागास, अति दलित अधिकार’ रॅलीत बोलत होते. सपा आणि बसपा दोघांनाही एकट्याने जिंकता येणार नाही, हे त्यांना माहीत असल्याचे राजभर म्हणाले. राजभर यांनी स्वत:बाबत बोलताना म्हटले की, जेव्हापासून या (स्वत:ला संबोधून) भगवान हनुमानाच्या वंशजाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. सपा आणि बसपा एकदम शांत झाले आहेत. दोन्ही पक्षांना ते एकट्याने लढू शकत नाहीत, हे समजले आहे. त्यामुळे सपा आणि बसपाने आघाडी केली आहे.
राजभर यांच्या मते, त्यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाची ३८ टक्के तर काही ठिकाणी ३६ टक्के भागीदारी असल्याचे सांगितले आहे. याचाच अर्थ ३६ टक्के ओबीसी समाजाच्या मतांसह इतर जातीचे २० टक्के मते एनडीएच्या खात्यात जमा होतील. ज्या लोकांनी लुटण्यासाठी महाआघाडी स्थापन केली आहे. ते गंगा नदीत बुडून जातील, असेही ते यावेळी म्हणाले. खरे तर राजभर हे नेहमी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करताना दिसतात. परंतु, त्यांनी आता अचानक यू-टर्न घेतल्याचे दिसून येत आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!