News Updates : बाराच्या बातम्या , गल्ली ते दिल्ली , एक नजर

1. मुंबईः डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणातील तिन्ही आरोपींना आज विशेष कोर्टात हजर करणार.
2. बंगळुरूः ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन
3. अरबी समुद्रात चक्रीवादळाचा हवामान खात्याचा इशारा, कोकणासह मुंबईत पावसाच्या सरींची शक्यता
4. मनी लॉड्रिंगप्रकरणः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल चौकशीसाठी ईडीच्या मुख्यालयात हजर.
5. भाजपकडून आज पश्चिम बंगालमध्ये १२ तासांच्या बंदची हाक, काळा दिवस पाळणार
6. इटावा : राजधानी एक्स्प्रेसने १० जणांना उडवलं, चौघांचा मृत्यू तर ६ जण जखमी
7. सोलापूर : रंगभवन जवळील पहिल्या चर्चसमोरील कब्रस्तानमधील रस्त्याच्या बाजूस असलेल्या १५ हुन अधिक फर्निचर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखाेंचे नुकसान
8. नाशिक : हरणगाव धरणात बुडून १२ वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू
9. पंजाब : कठुआ बलात्कार, हत्या प्रकरणाचा आज निकाल. पठाणकोट कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था. थोड्याच वेळात निकाल.
10. चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मौजा मूरमाडी येथील तुळशीराम पेंदाम या गुराख्याला वाघाने ठार केले. आठ दिवसातील तिसरी घटना.
11. नवजोत सिंह सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी-वाद्रा यांची भेट घेतली.
12. वर्ल्डकपः दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आज सामना रंगणार.