News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1.उत्तर प्रदेशः जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे राज्यभरात २६ जणांचा मृत्यू; ५७ जण जखमी
2.मुंबईः मरीन ड्राइव्हवर सापडले दोन मृतदेह; पती पत्नी असल्याचा पोलिसांचा अंदाज, कीटकनाशक घेतल्याने मृत्यू झाल्याचा संशय
3.दिल्लीः ३५ वर्षीय इसमाची गोळ्या झाडून हत्या
4.ममता बॅनर्जी किम जोंग उनप्रमाणे वागत आहेत; केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांची टीक
5.मालदीव, श्रीलंका दौऱ्यामुळे उभय देशातील संबंध आणखीन दृढ होतील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास
6.मुंबईः नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; वर्षा बंगल्यावर सुमारे अर्धा तास चर्चा
7.जनता दल युनायटेडला राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता, बाण चिन्ह निश्चित; निवडणूक आयोगाची माहिती
8.औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ कोटी ५२ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला पुनर्विलोकन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडून रद्द
9.अलीगड येथील २.५ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी घेतली कुटुंबियांची भेट; राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याची सरकारवर टीका
10.अलवर सामूहिक बलात्कारप्रकरणी तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी थानागाजी पोलीस स्थानकातील पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे राजस्थानच्या गृह मंत्रालयाचे आदेश
11.ठाणे : शेतकऱ्याकडून काजुगर खरेदी करुन एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातच्या कच्छमधून सुमीतकुमार राजेश असनानी उर्फ महेश ग्यानचंदानी याला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक
12.कोल्हापूरः जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विजय शिंदे यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; मुलाला नोकरी लावणयासाठी ८.५० लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप
13.विरार – स्विमींग पूलमध्ये बुडून मुलीचा मृत्यू
14.वर्धा : विषारी दारू पिल्याने करंजी ( भोगे) येथील पिता पुत्राचा मृत्यू
15.अपघातग्रस्तांच्या मदतीऐवजी बघ्याची भूमिका घेऊन व्हिडीओ बनवणाऱ्यांवर होणार कारवाई