Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माता नव्हेच !! तिसरी मुलगी झाली म्हणून तिने १० दिवसाच्या चिमुकलीची स्वतःच घोटला गळा !!

फाईल चित्र । प्रतिकात्त्मक

Advertisements
Advertisements
Spread the love

तिसरी मुलगी झाली म्हणून आईनेच दहा दिवसाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी अनुजा काळे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ माजली. असा क्रूरपणा करणाऱ्या महिलेला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आता समोर येत आहे.

Advertisements

मुलगाच हवा या अट्टहासातून अनेकदा स्त्रीभूण हत्येसारखे प्रकार समोर येतात. नाशिकमध्ये तर जन्मदात्या आईनेच गळा दाबून मुलीची हत्या केली. या घटनेनंतर मुलीची हत्या करणाऱ्या पत्नीविरोधात पतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी अनुजा काळे हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तसंच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!