News_Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1. नागपूरला अवकाळी पावसाने झोडपले, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस
2. पुणेः भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मेक्सिकन सरकारचा ‘ऑर्डन मेक्सिकाना’ पुरस्कार प्रदान.
3. नागपूर : नितीन गडकरींच्या नेतृत्वात देशात रोजगारनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड तुटतील. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना येणारा काळ सुवर्णकाळ ठरेल – मुख्यमंत्री
4. मुंबईः सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सीची भाडेवाढ करा, दीड किलोमीटरला भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये करण्याची, मुंबईतील टॅक्सी संघटनांची मागणी
5. औरंगाबादः आचारसंहिता संपताच पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचाऱ्यांची बदली, २१० जणांच्या आयुक्तालयांतर्गत बदल्या
6. राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात केंद्र सरकारला अहवाल सादर, सचिव आर. सुब्रमण्यम यांची माहिती
7. कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे यांच्या विनंतीनुसार सिद्धार्थनगर कृती समितीच्यावतीने प्रवेशद्वारासाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित, रात्री उशीरा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मालोजीराजे यांची भेट घेतली
8. पुणेः अभ्यासावरून आई-वडील रागवल्यामुळे राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशी (वय २१) याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, कोथरूड परिसरातील परमहंस नगर येथील घटना
9. कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा येथे पाण्यात बुडून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, अंजली चव्हाण (रा. कबनूर, ता. हातकणंगले) असे तिचे नाव
10. नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली
11.पुणेः दुचाकीचा अपघात होऊन ‘ब्रेनडेड’ झालेल्या ज्येष्ठ महिलेने एका तरुणाला यकृत तर दोघांना मूत्रपिंड दान करून तिघांना जीवदान. नाशिकमधील तरुणाला यकृत तर जहांगीर आणि दीनानाथ रुग्णालयातील दोघांना मूत्रपिंड दान
12. नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली