Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभेत १० टक्के खासदार नसल्याने विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा हक्क नाही : सुरजेवाला

Spread the love

देशभरातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवरच विजय मिळाला आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी ५४ जागांची आवश्यकता असते, त्यामुळे काँग्रेसला दोन जागा कमी पडत आहेत. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत, तब्बल ३०३ जागांवर विजय मिळवला आहे.या पार्श्वभूमीवर  काँग्रेस लोकसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करणार नाही, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात सुरजेवाला म्हणाले की, लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी १० टक्के म्हणजेच ५४ सदस्यांची आवश्यकता असते. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही म्हणुनच आमचे संख्याबळ ५४ होईपर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करणार नाही. आम्ही ही जबाबदारी सरकारवरच सोडली आहे. त्यामुळे आता त्यांनीच ठरवायचे आहे की एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद द्यायचे की नाही.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची शुक्रवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधा यांची चौथ्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. सोनिया गांधी २०१४ पासून या पदावर आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!