Aurangabad : न्यूरॉलॉजिस्ट डॉ. इश्तीयाक अन्सारी यांच्या पाच वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरातील सुप्रसिध्द न्युरोलॉजिस्ट डॉ. इश्तीयाक अन्सारी यांच्या पाच वर्षीय मुलाने  घरात खेळतांना कुलरमध्ये हात घातल्याने विजेचा धक्काचा लागून त्याचा मृत्यू झाला आहे. काल बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. रियान इश्तीयाक खान अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव आहे. रियान हा  होता. बुधवारी रियान संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावर खेळत होता. खेळता खेळता त्याचे खेळणे कुलर मध्ये पडले. ते काढण्यासाठी त्याने थेट कुलर मध्ये हात घातला. त्यात त्याला जोराचा झटका बसला. कुटुंबियांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी थेट त्याला लांब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्का बसला. त्यातील एकाने तत्काळ वायर पिन काढली व रियानला बाजुला केले व रुग्णालयात दाखल केले. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आज  सकाळी रोजाबाग येथील कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!