शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Advertisements

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफाचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता पुढील तपासणीसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

डिस्चार्जनंतर पंतप्रधान मोदींचा फोन

शरद पवार यांना पुण्यातील रूबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि विश्रांती घेण्यासह तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!