Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे आंदोलन; NEET पेपर लीक आणि CJP मोर्चावरील पोलिस कारवाईवरून केंद्र सरकारला घेरलं

Advertisements
Advertisements
Spread the love

आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सोमवारी संसद परिसरात आंदोलन करत NEET पेपर लीक प्रकरण आणि CJP च्या संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली.

Advertisements

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर आझाद म्हणाले, “आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान बाळगतो. मात्र, लोकशाहीमध्ये मतभेदांचा आवाज लाठीच्या जोरावर दाबला जाऊ शकत नाही.”

Advertisements
Advertisements

‘सरकार उपोषणकर्त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होतं का?’

चंद्रशेखर आझाद यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “जंतर-मंतरवर ३० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि अनेक जण २० दिवसांहून अधिक काळ उपोषण करत आहेत. सरकार त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होतं का?”

ते पुढे म्हणाले की, “काल देशातील तरुण रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांच्यावर झालेली पोलिसांची कारवाई धक्कादायक होती. विद्यार्थी भुकेले-तहानले आंदोलन करत असताना मी शांत बसू शकत नव्हतो. त्यामुळे मी स्वतः आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.”

‘हे राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर विद्यार्थी होते’

आझाद यांनी सांगितले की, “ज्यांच्यावर कारवाई झाली ते कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. ते शिक्षण घेणारे तरुण आणि विद्यार्थी होते. त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.”

ते म्हणाले, “मी एक सुशिक्षित, जागरूक भारतीय नागरिक आणि खासदार म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली रात्रभर बसलो. या लढ्याला बळ देण्यासाठी मी आंदोलनकर्त्यांसोबत उभा आहे.”

लोकसभा अध्यक्षांशी चर्चा, संवादासाठी तयारी

चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले की, त्यांनी लोकसभा अध्यक्षांशी या संपूर्ण परिस्थितीबाबत चर्चा केली आहे. तसेच सरकार संवादासाठी पुढे आल्यास आपण चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “मी कोणाशीही संवाद साधण्यासाठी तयार आहे. मात्र, जर सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर हे आंदोलन आणखी व्यापक होईल.”

दरम्यान, NEET पेपर लीक, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि CJP च्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आणि संसदेबाहेर विरोधक सरकारला सातत्याने घेरत आहेत.

#LiveUpdate | ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!