Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरोपींची निर्दोष सुटका होताच मालेगावात फटाके फोडून हिंदुत्त्ववादी संघटनांचा जल्लोष… !!

Spread the love

मालेगाव : मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची पुरेशा पुराव्या अभावी निर्दोष सुटका केल्याचा निकाल घोट करताच मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष करण्यात आला. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

मालेगावात जल्लोष सुरु असतानाच फटाके फोडण्यावरून हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला फटाके फोडू द्या. आनंदाचा दिवस आहे, असे विनंती पोलिसांनी केली. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांचा विरोध डावलून फोडले फटाके

दरम्यान पोलिसांकडून फटाके फोडले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देण्यात आला. मात्र, कार्यकर्ते फटाके फोडण्यावर ठामच राहिले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालेल. पण, फटाके फोडणारच अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. तर फटाक्यांची लड फोडत असताना पोलीसांनी फटाके जप्त केले. तर कार्यकर्त्यांनी लडीचे तुकडे-तुकडे करत आतषबाजी करून जल्लोष केला.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

मालेगाव स्फोट प्रकरणात न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की, बॉम्बस्फोट झाल्याचं तथ्य सरकारी पक्षानं सिद्ध केलं असलं, तरी हा स्फोट स्कूटरमध्येच झाला, हे दाखवण्यात ते अपयशी ठरले. तपास प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी असल्याचंही न्यायालयाने अधोरेखित केलं. न्यायालयात झालेल्या सविस्तर वाचनात स्पष्ट करण्यात आलं की, पंचनामा योग्य पद्धतीने करण्यात आलेला नव्हता.

स्फोटस्थळी आढळलेले हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच, स्फोटात वापरलेली दुचाकी नेमकी कोणाची होती, याबाबतही स्पष्टता नव्हती. त्या दुचाकीचा चेसीस नंबर कधीही रिकव्हर करण्यात आलेला नाही, आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्या दुचाकीच्या मालकिणी होत्या, हेही ठोसपणे सिद्ध झालं नाही. बैठकांच्या संदर्भातील तपास यंत्रणेचे दावेही न्यायालयाच्या समाधानास पोहोचले नाहीत. याशिवाय, सुरुवातीला लावण्यात आलेला ‘मोक्का’ कायदा नंतर मागे घेण्यात आल्यामुळे त्या आधारे नोंदवलेले सर्व जबाब न्यायालयाने अमान्य ठरवले.

न्यायालयाने  व्यक्त केली शंका…

UAPA अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत देखील न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले. या कायद्याअंतर्गत कारवाईसाठी आवश्यक असलेली मान्यता योग्य पद्धतीने घेतली गेली नाही, त्यामुळे UAPA लागू होत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याआधी घेण्यात आलेल्या अधिकृत मान्यतेवरही न्यायालयाने शंका व्यक्त केली.

आरडीएक्स त्यांनी आणल्याचं कुठलाही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं की, केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही. त्यामुळे सर्व सातही आरोपींना ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ देत निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला. न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व ७ आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.
“मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचे वय १०१ नाही तर ९५ वर्षे होते आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालय काढला आहे’,असं निकाल वाचताना एनआयए कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले.
स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता
२९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता.

 

 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आजचा दिवस महत्त्वाचा, 17 वर्षानंतर NIA कोर्टातून येणार निकाल
मुंबई: आजचा दिवस फार महत्त्वाचा आणि मोठा आहे. तब्बल 17 वर्षांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल जाहीर होणार आहे. 2008मध्ये मालेगावातील भिकू चौकात झालेल्या या स्फोटात 7 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 92 जण जखमी झाले होते.
19 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता.हायप्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपासयंत्रणा, बदललेले न्यायाधीश, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत देशभरात चर्चेत राहिला आहे.
या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत.

या आरोपींविरोधात आयपीसी कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आलाय. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना यात फरार आरोपी दाखवण्यात आलं आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
29 सप्टेंबर 2008: मालेगावातील भिकू चौकात एका दुचाकीत बॉम्बस्फोट झाला. यात 7 जणांचा मृत्यू झाला (नवीन आकडेवारीनुसार 6 जण), तर 92 जण जखमी झाले. त्यानंतर तपासाची सूत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आली.
23 ऑक्टोबर 2008: बॉम्बस्फोटासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वाहनाचा वापर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
4 नोव्हेंबर 2008: लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटात RDX चा वापर झाल्याचा आरोप होता.
20 जानेवारी 2009: एकूण 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
2010: या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला.
2016: NIA ने आरोपींवरील ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) हटवण्याची विनंती केली. तसेच, NIA ने आरोपपत्र दाखल करत साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह तिघांना (साहू, कलसांगरा, तकलकी) क्लीन चिट दिली, पण कोर्टाने ती मान्य केली नाही.
2017: कोर्टाने ‘मकोका’ हटवण्यास परवानगी दिली, परंतु आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत आरोप निश्चित केले.
31 जुलै 2025- साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित,मेजर रमेश उपाध्याय,समीर कुलकर्णी,अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आज सुनावणी होणार आहे.

 

 

आचार्य चाणक्य म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीने एकदा अपमान सहन केला तर त्याला ज्ञानी म्हटलं जाते. जर त्याने तो दोनदा सहन केला तर त्याला महान म्हटलं जातं, परंतु जो वारंवार अपमान सहन करतो त्याला मूर्ख म्हटलं जातं.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मानवी जीवनात आदराची किंमत मृत्यूपेक्षा जास्त असते. अपमान सहन केल्यानंतर बरेच लोक गप्प राहतात, परंतु वारंवार अपमान सहन करणे योग्य नाही. अपमानाचा एक घोट विषापेक्षा जास्त कडू असतो.

जर कोणी तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्ही त्याच क्षणी त्याला योग्य उत्तर दिलं पाहिजे, अन्यथा लोक तुमच्या मौनाला कमकुवतपणा मानू लागतात.
रागाच्या भरात उत्तर देण्याऐवजी शांत आणि गोड वर्तन स्वीकारा. यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येईल. पुढच्या वेळी तो हे करण्यापूर्वी नक्कीच विचार करेल.

जे इतरांचा अपमान करतात त्यांना जीवनात दुःख आणि अपयशाचा सामना करावा लागतो. अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगले.

अपमान मनावर घेऊ नका, तर त्याला तुमची प्रेरणा बनवा आणि स्वतःला इतके मजबूत बनवा की तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील.

आचार्य चाणक्य यांच्या मते, स्वतःला इतके यशस्वी बनवा की आज तुमचा अपमान करणाऱ्यांना उद्या तुमची प्रशंसा करावी लागेल. यामुळे त्यांना एके दिवशी त्यांची चूक लक्षात येईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!