Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UBT NewsUpdate : औरंगाबादेत उद्धव सेनेच्या उमेदवाराची माघार , तातडीने दिला दुसरा उमेदवार….

Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी अचानक निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला  असून यामुळे उद्धव सेनेला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, या मतदारसंघासाठी उद्धवसेनेने तातडीने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. तनवाणी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे सेनेवर नामुष्कीवेळ आली आहे.  दरम्यान  ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे यावेळी दानवे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने  आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली. मात्र आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन तनवाणी यांनी अचानक निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. या धक्क्यातून सावरत उद्धवसेनेने तत्काळ दूसरा उमेदवार घोषित केला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. थोरात हे छत्रपती संभाजीनगर मध्यचे शहरप्रमुख असून माजी नगरसेवक आहेत. थोरात आणि शिवसैनिकांनी किशनचंद तनवाणी यांना तिकीट जाहीर होताच त्यांना विरोध करण्यासाठी मातोश्री गाठली होती परंतु ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर तनवाणी यांनी स्वतःच निवडणुकीतून माघार घेतली आहे.

तनवाणी यांची भूमिका…

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. त्यानंतर सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. तसेच आता २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!