Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoojaKhedkarNewsUpdate : चर्चेतली बातमी : काय आहे नेमके पूजा खेडकर प्रकरण ? खेडकर कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन काय ?

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी नियुक्त असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध सुविधा मागितल्यामुळे चर्चेत आल्यानंतर त्यांच्याशी अनेक माहिती माध्यमातून दिली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेले व्हाट्सअप मेसेज, त्यांचे मॉक इंटरव्यूचे व्हिडीओ आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित व्हिडीओ , प्रमाणपत्रेही व्हायरल केले जात आहेत. त्यातच पूजा खेडकर यांच्या आईचा २०२३ चा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये त्या पिस्तुल काढून शेतकऱ्यांना धमकावताना दिसल्या. आता खेडकर कुटुंबाचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मात्र याविषयी अद्याप कुठल्याही राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. 

दरम्यान इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी पंकजा मुंडे यांच्या “गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण” या संस्थेला ऑक्टोबर २०२३ मध्ये १२ लाख १२ हजार १२ रुपयांचा धनादेश देणगीस्वरुपात दिला होता. मुंडे कुटुंबाकडून ही बिगर सरकारी संस्था चालविली जाते. याशिवाय खेडकर कुटुंबियांनी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, असा नवस केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पाथर्डीमधील श्री मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण केला.

Advertisements

आणखी माहितीनुसार पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे बंधू माणिक मामा खेडकर हे भाजपाचे पाच वर्ष पाथर्डी तालुकाध्यक्ष होते. पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या सरपंच म्हणूनही पूजाच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी काम पाहिले आहे. दरम्यान दक्षिण अहमदनगरचे लोकसभा उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला भालगावमधील स्थानिकांनी विरोध केल्यामुळे माणिक खेडकर यांचे तालुकाध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. ज्यामुळे पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत निवडणूक लढविली आहे. मात्र या निवडणुकीत दिलीप खेडकर यांना लोकसभा निवडणुकीत १३,७४९ एवढी मते मिळवून ते चौथ्या क्रमाकांवर राहिले. माणिक खेडकर आणि दिलीप खेडकर हे पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जातात.

Advertisements
Advertisements

दरम्यान मुळशी येथील शेतकऱ्याला हातात पिस्तुल घेऊन धमकावल्याप्रकरणी २०२३ चा व्हिडीओ व्हायरल होताच पुणे पोलिसांनी तत्परतेने दखल घेत गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८ आणि १४९ अंतर्गत मनोरम खेडकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

पूजा खेडकर (३४) या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या वाशिम जिल्ह्यात त्यांची प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची प्रशिक्षणासाठी नियुक्ती झाली असताना वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून सुविधा मागण्यासाठी त्यांनी दबाव टाकला असल्याचे पुढे आले आहे. तसेच यूपीएससीची परीक्षा देत असताना बहुविकलांगिक असल्याचे आणि ओबीसी नॉन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र त्यांनी जोडले असल्याचे आरोप झाल्याने पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर त्यांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत या सर्व प्रकरणात एक सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरु केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!