Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजीव गांधी यांच्याबद्दल बोलतात, मोदीजी तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही : राज ठाकरे

Advertisements
Advertisements
Spread the love

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानावरून चांगलेच रण पेटले असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी नरेंद्र मोदींना देश कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना, ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्या विधानावर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली.

Advertisements

आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हांला देश कधीही माफ करणार नाही, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत असताना राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!