शासन आपल्या दारी कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काढला दंडाचा फतवा

Jalgaon : शासकीय योजनांचा लाभ अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन जिल्हानिहाय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मोठा खर्च झाल्याची टीका विरोधक करत आहेत. अशी टीका होत असतानाच जळगावातील कार्यक्रमातून एक वेगळीच बाब समोर आली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंडाचा फतवा काढण्यात आला.
जळगावमध्ये आज (4 मार्च) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून महिला बचत गटांना यासाठी टार्गेट करण्यात आले होते. तसेच जर महिला बचत गटातील महिला शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थित न राहिल्यास 50 रुपये दंड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भातील मेसेज आणि उलट सुलट प्रतिक्रिया आता जळगावमधील सोशल मीडिया ग्रुपमधून व्हायरल होत आहेत.
गर्दी जमवण्यासाठी दंडाचा फतवा काढला?
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी दंडाचा फतवा काढल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोणतेही कारण न देता या कार्यक्रमाला उपस्थित रहावेच असेही म्हटले आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी हा कुठला प्रकार? अशी विचारणा होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये शेतात असा, लग्नाला जावा किंवा आणि काहीही असो कुठलेही कारण ऐकले जाणार नाही, पन्नास रुपये दंडही केला जाईल, असे म्हटले आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765