Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शेतकरी आंदोलनासंबंधीचे अकाऊंट्स आणि फॅन पेज X प्लटफॉर्मवर बंद करण्यास सरकारने दिला आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

तकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अकाउंट्स सोशल मीडिया प्लटफॉर्म X ने बंद केले आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनासंबंधीचे अकाऊंट्स आणि फॅन पेजेसवर ही कारवाई करण्यात आली आहे. इलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीने सरकारच्या आदेशाचे पालन केले असले तरी याच्याशी आपण सहमन नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements

भारत सरकारने X वरून काही खाती ब्लॉक करण्याचे आदेश कंपनीला दिले होते. एक्सने सरकारचा हा आदेश मान्य केला आहे, पण सहमत नसल्याचेही सांगितले आहे. X ने म्हटले की, भारत सरकारच्या आदेशानंतर काही X खाती ब्लॉक किंवा सस्पेंड करण्यात आली आहेत. परंतु आम्ही याच्याशी सहमत नाही. लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

Advertisements
Advertisements

भारत सरकारने काही ठराविक खात्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि ही खाती आणि पोस्ट केवळ भारतातच बॅन केल्या जातील. आम्ही या कृतीशी सहमत नाही, असेही एक्सने म्हटले आहे.

भारत सरकार सामाजिक सलोखा बिघडू शकेल असे वादग्रस्त अकाऊंट किंवा सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश देते आहे. या संदर्भात, X ला जास्तीत जास्त आदेश मिळत आहेत. सरकारचे दोन्ही आदेश शेतकरी आंदोलनाच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनानंतर ही खाती पुन्हा सुरु केली जाऊ शकतात.

गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 14 आणि 19 फेब्रुवारी रोजी आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत आदेश जारी केले. गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 177 सोशल मीडिया खाती आणि वेब लिंक्स तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!