काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारांची नावे केली जाहीर, आज सोनिया गांधी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज भारणार

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी बुधवारी राज्यसभेसाठी राजस्थानमधून अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील. यामुळे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा एक दिवस थांबविणार आहेत.
दरम्यान काँग्रेसने राज्यसभेच्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली, राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.यंदा काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिला आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी २००४पासून येथून निवडणूक लढवत आहेत. रायबरेली ही जागा काँग्रेसची सुरक्षित जागा मानली जाते. १९५२पासून काँग्रेसचा येथे फक्त तीन वेळा पराभव झाला.
Congress releases a list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
Sonia Gandhi from Rajasthan
Abhishek Manu Singhvi from Himachal Pradesh pic.twitter.com/lXFCvMXgZp— ANI (@ANI) February 14, 2024
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765