तलावात बोट उलटली ,सहलीला गेलेल्या 12 विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू , ८ जणांना वाचवण्यात यश …

Advertisements
Advertisements
Spread the love

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. हर्णी तलावात बोट उलटली. बोर्डात 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. त्यात 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीत २३ विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे. चार ते पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बोटीची क्षमता 14 लोकांची होती परंतु 27 हून अधिक लोक बोटीमध्ये होते. तलावाच्या देखभालीचे काम खासगी कंपनीकडे आहे.

सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील होते. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 10 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तेथे पोहोचले.

Advertisements

सीएम भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, “वडोदराच्या हरणी तलावात बुडून मुलांची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी मी दु:खी आहे.” विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो.बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बचावकार्य सुरू आहे.अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. . आहे.”

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असून ते येथे सहलीसाठी आले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते.

सात एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर हरणी तलाव विस्तारलेला असून या तलावाचे सुशोभीकरण सन २०१९ मध्ये करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!