तेलंगणामध्ये खासगी बसला आग, एका महिलेचा होरपळून अंत तर अन्य 4 प्रवासी जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

तेलंगणामध्ये हैदराबाद-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एररावल्ली चौकाजवळ आज पहाटे 2.30 च्या सुमारास एका खासगी बसला आग लागल्याने एका महिलेचा होरपळून अंत झाला तर अन्य चार प्रवासी जखमी झाले. माहिती मिळताचअग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. चालकाला गाडी चालवताना झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Advertisements

खिडक्यांच्या काचा फोडून प्रवाशांनी मारल्या उड्या

हैदराबादहून चित्तूरला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्वो बस पलटी होऊन आग लागली. बसमध्ये 40-50 प्रवासी होते दरम्यान, बसला आग लागल्यावर जवळपास सर्वच प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उड्या मारल्या.

Advertisements
Advertisements

या आगीत एक महिला गाडीतच अडकली आणि त्या महिलेचा होरपळून अंत झाला, या आगीत चार प्रवासी जखमी झाले आहेत त्यातील तिघांना गडवाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका व्यक्तीला हैदराबादला हलवण्यात आले आहे.

ही माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चालकाला गाडी चालवताना झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!