MarathaAndolanUpdate : सरकारी शिष्टमंडळाचे प्रयत्न फेल , ४ दिवसाची मुदत देतो , अध्यादेश काढा , जरांगे उपोषणावर ठाम …

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेले उपोषण सोडावे यासाठी शासनाच्या वतीने करण्यात आलेला दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. चार दिवसांचा वेळ देतो आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा उपोषण चालूच राहील असा इशारा उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारी शिष्टमंडळाला दिला. आंदोलन मागे घेणार नाही,आरक्षणाची मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सांगितलं की, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क होत नाही. पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारचे हे शिष्टमंडळ उद्या पुन्हा एकदा आपली भेट घेणार आहेत आणि या प्रश्नी आपण चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी म्हटले की, सरकारसोबत चर्चा झाली आहे. मागील ५० वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकारला अहवाल द्यायचा आहे. पण आपण आंदोलन मागे घेत नाही. सरकारला आपण चार दिवसांचा आणखी वेळ दिला आहे. त्यानंतर सरकार जीआर घेऊन येतील. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू असणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले.
एक महिन्यात आरक्षणाचा अहवाल येणार: गिरिश महाजन
एक महिन्याच्या आत आरक्षणाबाबतचा अहवाल अधिकारी देणार आहे. त्यामुळे एक महिन्यात हा प्रश्न मार्गी लागणार असून, तेवढा वेळ देण्यात यावा. न्यायालयात टिकणार आरक्षण सरकराला द्यायचं आहे. काल काही माजी न्यायाधीश यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चर्चा करण्यासाठी आम्हाला पाठवले आहेत. येथे आल्यावर आम्हाला वाटलं मनोज दरांगे आमचं ऐकतील. पण आम्हाला दरांगे यांच्या तब्येतीची काळजी आहे. आम्ही आता शब्द दिला आहे. झालं तर आरक्षणाचं काम १० दिवसांत होईल. सरकार सकारात्मक आहे. मागच्या वेळी आम्ही आरक्षण दिलं होतं, ते न्यायालयात पण टिकले. आता तो विषय सोडून घ्या. लाठीहल्ल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटले.जरांगे यांनी चार दिवसांचा वेळ दिला असून त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन म्हणाले.
मराठवाड्यातील मराठ्यांनी काय केलं?
सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात पोहचले आज सायंकाळच्या सुमारास पोहचले. यावेळी गिरीश महाजन ,आणि अर्जुन खोतकर यांनी अमोल मनोज जरांगे यांची भेट त्यांच्यासोबत चर्चा केली. तसेच यावेळी सरकारची भूमिका त्यांना सांगितली. यावेळी उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तर जरांगे यांच्या प्रकृती पाहता त्यांनी उपोषण मागे घेतलं पाहिजे, सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक असून एक महिन्याच्या वेळ देण्याची मागणी महाजन यांच्याकडून करण्यात आली. पण आम्हाला आरक्षण हवं आहे, मराठवाड्यातील मराठ्यांनी काय केलं? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी यावेळी महाजन यांना विचारला.
जे काय बोलायचे ते इथेच बोला …
गिरीष महाजन चर्चा करत असतानाच काही कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी मनोज जरांगेंनी यांनी कार्यकर्त्यांना थांबवलं. संपूर्ण आयुष्य आपलं घोषणाबाजी करण्यात गेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला आरक्षण हवं आहे. फक्त घोषणाबाजी करून काय करणार. सराकरचं शिष्टमंडळ आले असून, त्यांच्यासोबत चर्चा करू असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी थांबवली. दरम्यान आपण बाजूला जाऊन बोलू थोडं बाहेर चला अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी केली तेंव्हा जे काही बोलायचे ते येथेच बोला. बाजूला नाही असे जरांगे यांनी बोलताच उपोषण स्थळीच सर्व चर्चा झाली.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, संदीपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी मंंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे आदींची उपस्थिती होती. आमचा मूळ व्यवसाय शेती आहे. विदर्भ, खानदेशात कुणबी मराठा आरक्षण आहे. ते ओबीसीत आहेत. ओबीसीच्या यादीत ८३ क्रमांकवर मराठा आहे. त्यामुळे सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली. शांततेत आरक्षण सुरू होतं. तुम्ही आमची डोकी फोडली. आणखी चार दिवसांचा वेळ घ्या, काहीही करा पण चार दिवसांनी जीआर द्या. अन्यथा नंतर अन्न-पाणी त्याग करू, असा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला.