Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसीला द्यावे , छगन भुजबळ यांची मन की बात

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासमोर आपल्या ‘मन की बात’ मध्ये आपल्याला संघटनात्मक हवी आहे विरोधी पक्ष नेते पद नको असे सांगताच पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांनीही बोलण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे.विरोधी पक्ष नेतेपद जर मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी किंवा लहान समाजाकडे हवे असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisements

भुजबळ पुढे म्हणाले की , “आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना वेगळ पद किंवा काम करायचे आहे पण ते पक्षातच काम करणार म्हणतात. माझे मत सुद्धा मी मांडतो. मला फक्त चार महिने अध्यक्षपद मिळाले. भाजपने बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला अध्यक्ष केले. काँग्रेसने सुद्धा दिले. आमच्या पक्षातसुद्धा ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे , जितेंद्र आव्हाड आहेत, मला दिले तर मी सुद्धा काम करेन. छोट्या समाजाला अध्यक्षपद दिले पाहिजे असे मला वाटते. “ओबीसी नेता प्रदेशाध्यक्ष करावा, याबाबत अद्याप शरद पवार यांच्याशी बोलणे झाले नाही. माझे मत मी आता मांडत आहे. अजित पवार यांचे म्हणणे शरद पवार ऐकत होते. ते ठरवतील आणि यावर निर्णय घेतील,” असेही छगन भुजबळ म्हणाले.

Advertisements
Advertisements

 

चलनातून बाद झालेल्या दोन हजारांच्या गुलाबी नोटा साईंच्या दानपेटीत


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!