Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमदेवारीवर रामदास आठवले यांची ना पसंती

Spread the love

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी असलेल्या रामदास आठवले यांनी रविवारी टीका केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर यांचे नाव आरोपी म्हणून आले आहे आणि हेमंत करकरे यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा होता, असे ठाकूर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले. आरपीआयने लोकसभा निवडणुकांसाठी मध्य प्रदेशात जबलपूर, सतना, रतलाम, मुरेना व सिधी या ठिकाणांहून उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित २४ मतदारसंघांत आपला भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

‘भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत जी विधाने केली ती आम्हाला अजिबात मान्य नाहीत’, असे स्पष्ट करून, ‘साध्वी ठाकूर यांना आमच्या पक्षाने कधीही उमेदवारी दिली नसती’, अशा भावना केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केल्या.

‘नागरिकांचा बचाव करताना, दहशतवाद्यांशी लढताना करकरे हुतात्मा झाले. माझ्या शापाने करकरे यांचा मृत्यू झाला, हे साध्वींचे विधान अनुचित व निषेधार्ह आहे. ‘,असे आठवले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!