लष्करातील ७ सेवानिवृत्त अधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

भारतीय लष्कराच्या सात निवृत्त अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्ट. जनरल जेबीएस यादव यांनी लेफ्ट. जनरल एस. के. पट्याल यांचाही यामध्ये समावेश आहे.
लष्कराच्या मुख्यालयात प्रदीर्घ काळ काम केलेले लेफ्ट. जनरल आर. एन. सिंग, लष्करच्या माहिती आणि आयटी सेवेचे माजी महानिदेशक लेफ्ट. जनरल सुनित कुमार, लेफ्ट. जनरल नितिन कोहली यांचाही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त निवृत्त कर्नल आर. के. त्रिपाठी आणि निवृत्त विंग कमांडर नवनीत मगन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
‘देशाचे संरक्षण धोरण ठरवताना या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल’, असा विश्वास सितारमन यांनी यावेळी व्यक्त केला.
‘माजी जवानांनाही राजकारणात येऊन देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. आम्ही निवृत्त झालो असलो, तरी अद्याप थकलेलो नाही. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि सुरक्षित हातांमध्ये आहे’, असे यादव म्हणाले.