Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

श्रीलंका साखळी बॉम्ब स्फोट , केरळमधून एनआयए ने घेतले दोघांना ताब्यात : बॉम्बस्फोटाचे कनेक्शन भारतात असल्याचा संशय

Spread the love

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांबद्दल दररोज नव नवे खुलासे होत आहेत. या बॉम्बस्फोटाचं कनेक्शन आता भारतामध्ये असल्याचे समोर येत आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) केरळमधून दोन तरूणांना ताब्यात  घेतलं आहे. अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी त्या तरूणांची नावं आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांकडून मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान श्रीलंकेच्या सुरक्षा एजन्सीजने सहा संशयितांची रेखाचित्रे आणि छायाचित्रे जारी केली आहेत. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.या प्रकरणात १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, केरळातील कासरगोड जिल्ह्यातून राष्ट्रीय सुरक्षा पथकाने रविवारी दोघांना ताब्यात घेतलं आहे. कासरगोडमधून अनेक तरूण अफगाणिस्थानमध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांचा संबंध श्रीलंका बॉम्बस्फोटातील सुत्रधार जहरान हाशीम याच्याशी असल्याचे वृत्त आहे. या दोघांची सध्या एआयएनच्या मुख्यालयात चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) रविवारी केरळमध्ये तीन ठिकाणी छापेमारी केली. २०१६ मधील आयसीसी कसारगोड मॉड्युल केससाठी एनआयएनं छापेमारी केली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांवर आयसीसच्या संपर्कात असल्याचा संशय आधीपासूनच आहे.

दरम्यान, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, श्रीलंकेत शुक्रवारी झालेल्या चकमकीत १५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये बॉम्बस्फोटातील सुत्रधाराच्या वडिल आणि दोन भावांचाही मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी झालेल्या चकमकीत जेनी हाशीम, रिलवान हाशीम आणि सुत्रधाराचे वडिल मोहम्मद हाशीम यांना शुक्रवारी पूर्व भागात झालेल्या चकमकीत मारले. या तिघांचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते येथील स्थानिकांच्या विरोधात बोलत असल्याचे दिसत होते. दहशतवाद्यांना प्रेरणा देत असल्याचेही यामध्ये दिसत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!