MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही , अजित पवारही आमच्यासोबत : नाना पटोले

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर : नागपूरमध्ये मविआची सभा होणार आहे. परंतु मविआच्या वज्रमूठ सभेआधीच महाविकास आघाडीमधील नाराजीनाट्य समोर येत आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नितीन राऊत हे नाराज नाहीत, नितीन राऊत यांच्याशी मी स्वत: बोलणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. तसेच अजित पवार हे आमच्यासोबतच असून, ते भाजपसोबत जाणार नसल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.

Advertisements

नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेआधीच महाविकास आघाडीमधील नाराजीनाट्य समोर येताना दिसत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नितीन राऊत हे नाराज नसून, मी स्वत: राऊत यांच्याशी बोलणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडीची सभा नागपूरमध्ये होणार आहे. जे काही ग्राउंड नागपूरमध्ये होतं, ते हेरिटेज म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. सरकार आमच्या सभेला घाबरलं असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!