Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : नागपूर पोलिसांची मोठी कारवाई , बीडला जाणारा १ कोटींचा गांजा जप्त …

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर : नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत १५०० किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पारडी परिसरात सापळा रचून जप्त केलेला हा गांजा सुमारे एक कोटी रुपये किमतीचा आहे.


या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गांजा ओडिशाहून बिडला पाठवला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली त्यानुसार  अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेला कारवाईचे निर्देश दिले होते.

Advertisements

अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारडी पुलाजवळ सापळा रचला. पोलिसांना एका ट्रकवर संशय आला. त्यांनी ट्रक थांबविला. तपासणी केली असता ट्रकमध्ये पोत्यात १५०० किलो गांजा आढळला. दरम्यान  स्थानिक पोलिसांनी बीड  पोलिसांशी संपर्क साधून तेथेही दोघांना अटक केली. बीडमधून हा गांजा कोणाला देण्यात येणार होता, याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!