AAPNewsUpdate : दिल्ली नंतर पंजाबमधील १० आमदार फोडण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप ….

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांनी दावा केला आहे की, भाजपने पंजाबमधील आपच्या दहा आमदारांशी संपर्क साधला आणि त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. केजरीवाल म्हणाले की, भाजप देशभरातील इतर पक्षांच्या आमदारांना विकत घेऊन सरकार पाडण्याचे काम करत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर ‘आप’चे आमदार खरेदी करण्याचा थेट आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर दिल्लीतील ‘आप’चे आमदार खरेदी केल्याचा आरोप केला होता.
Our 10 MLAs approached in Punjab by BJP; they are buying MLAs & breaking governments, claims CM Arvind Kejriwal
— Press Trust of India (@PTI_News) September 14, 2022
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांनी दावा केला आहे की भाजपने पंजाबमधील आपच्या दहा आमदारांशी संपर्क साधला आणि त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले.
पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘कोणत्याही मार्गाने’ दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. असा दावा करण्यात आला की, भारतीय जनता पक्षाने आपल्या चार आमदारांशी संपर्क साधला आणि त्यांना आपल्या पक्षात येण्यासाठी २०कोटी रुपयांची ऑफर दिली. त्यांत केजरीवाल यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. आणि विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर केला होता.