MaharashtraNewsUpdate : परंपरेला छेद देत मुलीनेच दिला बापाला मुख अग्नी….

सोयगाव / मनिषा पाटील : मुलगा वंशाचा दिवा असे मानण्याचा काळ आता मागे पडत चालला आहे. कायद्याने मुलगा मुलगी समान असताना समाजात काही ठिकाणी मुला -मुलीत भेद करण्यात येत असला तरी वर्तमान काळात हा भेद संपत चालल्याचीही उदाहरणे दिसत आहेत. त्याचीच प्रचिती भुसावळ येथे आली.
त्याचे झाले असे कि , भुसावळ येथील जुना जळगाव रोडवर असलेल्या भिरुड कॉलनीत दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पंढरी ओंकार बोखारे-पाटील यांचे वृद्धपकाळात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.पंढरी बोखारे-पाटील यांना एकच मुलगी निलीमा सुनील पाटील हि असून तिने मुलाप्रमाणेच आपल्या पित्याची सेवा केली. धर्म शास्त्र नुसार आई वडील यांच्या निधनानंतर मुलगा मुख अग्नी देतो.असे असले तरी २१ व्या शतकातील परिवर्णवादी विचारांच्या निलीमाताई ने वडिलांच्या निधनानंतर अग्नी देण्याचा निर्णय घेतला आणि निलीमाताईच्या निर्णयाचे समाज बांधवांनीही कौतुक केले.
निलीमाताई व त्यांचे पती सुनिल माणिक पाटील हे दोघे पती,पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सुनिल पाटील छत्रपती क्रांती सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहे. पाटील कुटुंबात शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा पगडा असून हे कुटूंब समाज सेवा हेच आपले कर्तव्य समजत असतात निलीमाताईंच्या धाडसाचे महिलान मध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसले. महिला ही सर्वच क्षेत्रात सक्षम असल्याचा हा पुरावा आहे. पत्रकार योगेश बोखारे-पाटील यांचे ते काका होत.