Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DharBusAccidentNewsUpdate : धार बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पीएम , मध्यप्रदेश सह राज्य सरकारकडून अर्थसहाय्य …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मध्ये प्रदेशमध्ये  धार येथे  महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यानंतर त्यांनी अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश एसटी महामंडळाला दिले आहेत. याशिवाय पंतप्रधान निधीतून २ लाख तर मध्य प्रदेश सरकारकडून प्रत्येकी ४ लाखाची मदत घोषित करण्यात आली आहे. 

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान मध्य प्रदेश सरकारच्या वतीनेही मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती मध्य प्रदेशाचे परिवहन मंत्री गोविंदसिंह यांनी दिली आहे. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

Advertisements
Advertisements

१३ मृतांपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातील अकोला आणि अमळनेरचे आहेत. अद्याप काही प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १५ जण वाचले आहेत. यापैकी ५-७ जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तर जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 असे हे क्रमांक आहेत.

ओळख पटलेल्या मृतांची नावे….

1. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान
2. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान
3. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर
4. निंबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर
5. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर
6. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला.
7. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!