AccidentNewsUpdate : हृदयद्रावक : बस अपघातात शाळकरी मुलांसह १६ प्रवासी ठार

शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील सेंज खोऱ्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. शंशारहून साईंजकडे येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात पडली. सकाळी ८.३० वाजता झालेल्या या अपघातात शाळकरी मुलांसह १६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बसमध्ये ४० ते ५० जण होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. या अपघाताबद्दल हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहि.
I received news about the private bus accident in Sainj valley of Kullu. The entire administration is present at the spot and the injured are being taken to the hospital. I pray to God to give peace to the departed souls and strength to bereaved families:Himachal CM Jairam Thakur pic.twitter.com/t9k5Mi1r63
— ANI (@ANI) July 4, 2022
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एजन्सीला दिली आहे. कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, सैंजला जाणारी बस जंगला गावाजवळ सकाळी ८.३० च्या सुमारास दरीत कोसळली. ते म्हणाले की, जिल्हा अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.
या अपघाताचे वृत्त समजताच हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , मला कुल्लूच्या सैंज खोऱ्यात खाजगी बस अपघात झाल्याची बातमी समजली. संपूर्ण प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. मृतांच्या आत्म्याला शांती आणि शोकाकुल कुटुंबीयांना शक्ती देवो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
Himachal Pradesh | 10 dead after a private bus rolled off a cliff in Jangla area of Sainj valley on Neoli-Shansher road of Kullu district. Injured being shifted to Local hospitals, teams from Kullu moved to spot: DC Kullu Ashutosh Garg pic.twitter.com/iJ06mN1SEF
— ANI (@ANI) July 4, 2022