AurangabadPoliceUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत पोलीस निरीक्षकावर चाकू हल्ला …!!

पहिल्या छायाचित्रात जिन्सी पोलीस स्टेशन तर दुसऱ्या छायाचित्रात आरोपी शेख मुजाहिद
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्यावर त्यांच्याच पोलीस ठाण्यातील नुकत्याच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने चाकू हल्ला केल्याचे धक्कदायक वृत्त आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
हल्ला झाला त्यावेळी पोलीस निरीक्षक केंद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेर एका संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते तेंव्हा आरोपी शेख मुजाहिद, वय ५० हा पोलीस ठाण्यात शिवीगाळ करताना दिसताच केंद्रे यांनी त्याला हटकले तेंव्हा त्याने कुठलाही विचार न करता पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या पोटावर गंभीर वार केले. या कर्मचाऱ्याने ५ जून रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेत केंद्रे यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.
घटनेचे वृत्त समजताचअॅपेक्स रुग्णालयात पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता, अपायुक्त अपर्णा गिते, दिपक गिर्हे, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, विठ्ठल पोटे, राजश्री आडे, अविनाश आघाव यांनी धाव घेत उपचार करणार्या डाॅक्टरांशी चर्चा केली. त्यांची शस्त्रक्रिया करण्याकरता युनाईटेड सिग्मा रुग्णालयाचे डाॅ.उन्मेष टाकळकर यांना बोलवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त अपडेट होत आहे.