AgnipathNewsUpdate : मोठी बातमी : भाजपच्या ऑफिसमध्ये “अग्निविरां”ना वॉचमन म्हणूनही प्राधान्य : विजयवर्गीय

इंदूर : देशभरातील तरुणांकडून ४ वर्षाचा कार्यकाळ असलेल्या केंद्र सरकारच्या “अग्निपथ” योजनेला विरोध होत असताना भाजपाचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनी भावी अग्निविरांना दिलासा देणारे वक्तव्य केले आहे. चार वर्षानंतर काय ? याचे उत्तर देताना विजयवर्गीय यांनी म्हटले आहे कि , ” मुझे आगर इस ऑफिस मी , बीजेपी के ऑफिस मे सेक्युरिटी रखना है तो मै अग्निवीरको प्राथमिकता दूंगा….”
केंद्र सरकारची अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर भारतातील आठ राज्यांमध्ये मोठा विरोध करण्यात आला. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगाणामध्ये या योजनेला तरुणांनी मोठा विरोध केला. दरम्यान केंद्र सरकारने या योजनेमध्ये तरुणांच्या विरोधानंतर बदल केले. तर भाजप नेत्यांकडून ठिकठिकाणी अग्निपथ योजनेच्या समर्थनार्थ मांडणी केली जात आहे. इंदूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलाश विजयवर्गीय यांनी भावी अग्निविरांसाठी दिलासादायक वक्तव्य केले आहे.
देश के युवाओं और सेना के जवानों का इतना अपमान मत करो।
हमारे देश के युवा दिन-रात मेहनत करके फ़िज़िकल पास करते हैं, टेस्ट पास करते हैं, क्योंकि वो फ़ौज में जाकर पूरा जीवन देश की सेवा करना चाहते हैं, इसलिए नहीं कि वो BJP के दफ़्तर के बाहर गार्ड लगना चाहते हैं। https://t.co/PQ8B30FYHz
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 19, 2022
भाजपच्या वॉचमन पदासाठी तरुण मेहनत करीत नाहीत : केजरीवाल
कैलाश विजयवर्गीय यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेस, आम आदमी पक्षाने भाजप आणि विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत देशाचा आणि विद्यार्थ्यांचा अपमान करुन नका असे म्हटले आहे. आपल्या देशातील युवक दिवस रात्र मेहनत करतात, शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्य दलात जाऊन आयुष्यभर देशसेवा करायची असते. भाजपच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षक होण्यासाठी ते मेहनत करत नाहीत,असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
अग्निपथ को लेकर सारी शंकाए दूर कर दी- भाजपा के कैलाश विजयवर्गीय ने।
ये सत्याग्रह इसी मानसिकता के खिलाफ है।#SatyagrahaAgainstAgnipath pic.twitter.com/yUYzPZAZDK
— Congress (@INCIndia) June 19, 2022
विजयवर्गीय यांनी केले योजनेचे समर्थन
दरम्यान भाजपच्यावतीने कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूर येथे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेचे फायदे सांगताना अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीर म्हणून काम करुन परतल्यावर त्याच्या हातात ११ लाख त्याच्या हातात असतील. आणि मला भाजपच्या या कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवायचा असेल तर मी अग्निवीराला प्राधान्य देईन, असे म्हटले आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी गळ्या शंका दूर केल्या : काँग्रेस
कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी अग्निपथ योजनेसंदर्भातील सगळ्या शंका दूर केल्याचं काँग्रेसने म्हटले . अग्निपथ योजनेविरोधातील सत्याग्रह याच मानिसकतेच्या विरोधात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. प्रशांत भूषण आणि समाजवादी पक्षाने देखील विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. कैलाश विजयवर्गीय वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वी देखील चर्चेत आले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
Now we know what the BJP really meant when they launched the campaign in 2019, ‘Main Bhi Chowkidaar’… pic.twitter.com/CE8pbcAfNg
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 19, 2022