AurangabadCrimeUpdate : सराफाला लुटणाऱ्या टोळीतील सहाव्या आरोपीलाही अटक

औरंगाबाद : जटवाडा घाटात पाच महिन्यांपूर्वी सराफाला लुटणाऱ्या आरोपीला हर्सूल पोलिसांनी चहा पिताना पकडले.विकास जनार्दन भडके उर्फ विक्की असे अटक आरोपीचे नाव आहे. शैलेश एकनाथ टाक या व्यापाऱ्याला २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५. ३० वा. मारहाण करत लुटले होते त्यापैकी दोन गुन्हेशाखेने तर तीन हर्सूल पोलिसांनी पकडले होते. तर अन्य एक आरोपी फरार होता.
सहावा आरोपी विकी त्याच्या आईसोबत पडेगावात राहात होता. त्याची आई भाजी विक्री करत होती. टाक यांना लुटल्यानंतर विक्की आईला घेऊन गंगापूर जवळील त्याच्या गावाकडे निघून गेला होता. त्याचे पडेगावातील मित्र त्याला मिस करत होते म्हणून आज त्याला मित्रांनी बोलावले.
दरम्यान विकी आल्यानंतर टपरीवर चहा पीत असल्याची टीप पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांना खबऱ्याने दुपारी १ वा. विक्की पडेगावात आल्याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पीएसआय रफिक शेख ,पोलीस कर्मचारी वसंत जिबडे, शिवाजी शिंदे यांनी तात्काळ पडेगावात जाऊन ताब्यात घेतले. अटकेची कारवाई पूर्ण होईपर्यंत ५ वाजले होते. वरील कारवाई पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे , सिडको विभागाचे सहाय्य्क पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
सिटीचौक पोलिसांनी आज पान्हा पकडला चोरटा
रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख सिराज शेख सईद रा. पाडेगाव कास्म्बरी दर्गा हा बारूदगर नाल्याजवळ काळ रात्री १० वा चोरीच्या मोटरसायकल सह उभा होता. त्यावेळी गस्तीवर असलेले पीएसआय रोहित गांगुर्डे यांनी संशयावरून ताब्यात घेत चौकशी केली असता तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार निघाला पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाई पार पाडली