AurangabadCrimeUpdate : जुगार अड्ड्यावर धाड पावणेदोन लाख रु. चा मुद्देमाल जप्त, २३ जणांवर कारवाई

औरंगाबाद- सातारा पोलिसांनी लक्की वाईनशॉप च्या वर मध्यरात्री धाड टाकूनमाजी नगरसेवक मोहम्मद नावेद सहित २३ जुगारी पकडले तर त्यांच्या ताब्यातून १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड हायवेवर लकी वाईन शॉप च्या चौथ्या मजल्यावर झंनामांना मोठ्या प्रमाणात खेळला जातो. व रात्री त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनोज अकोले यांनी धाड टाकून रख रक्कम, ,जुगाराचे साहित्य असे जप्त करण्यात आले, आरोपीना कोर्टात हजार राहण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या.
सिटीचौक पोलिसांनी मोबाईलचोर पकडला
नारळीबागेत आज पहाटे ६-३० वा. एक इसम चोरी करत असल्याचा फोन सिटीचौक पोलिसांना गस्तीवर असतांना आला घटनास्थळी पोलीस पोहोचताच पोलिसांनी चोरटा पकडला त्याच्या ताब्यातून चोरीचे ४ मोबाईल जप्त केले. तो बीडचा रहिवासी असून त्याचे नाव शेख अमजद शेख गफूर (२५) असल्याचे पोलिसांच्या सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहित गांगुर्डे करत आहेत