AurangabadCrimeUpdate : रुमालने गळा आवळून १६ वर्षीय मुलाची हत्या

औरंगाबाद : चोरी केलेला लोखंडी पाईप विकून मिळालेल्या पैशांची वाटणी करताना झालेल्या वादानंतर आरोपींनी १६ वर्षीय सहकारीचाच हातरुमालाने गळा आवळून हत्या केल्याची धक्कायक घटना दि. १४ मंगळवारी रोजी समोर आली आहे. युसूफ खान वय-१६ (रा.दादाकॉलोनी) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर सय्यद आमेर सय्यद सलीम वय-२१, फिरोज शेख वय-२७ ( दोन्ही रा.गल्ली क्र-७ दादा कॉलोनी) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनूसार, मयत आणि दोन्ही आरोपींनी दि. ११ शनिवारी रोजी एक लोखंडी पाईप चोरी केला होता. तो पाईप चौदाशे रुपयात भंगाराच्या दुकानात विकला. पैसे आल्याने तिघांनी मद्यपानाचा बेत आखला. शनिवारी १२च्या सुमारास मोंढा नाका येथील वाईनशॉप मधून तिघांनी दारू खरेदी केली व रिक्षाने जाधववाडी येथे गेले. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला. याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त होताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांची ओळख पटवत आरोपींना अटक केली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस उपयुक्त दीपक गिर्हे यांनी दिली.