Nupur Sharma News Update : प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी मुबई पोलिसांचे नुपूर शर्मा आणि जिंदालला समन्स जारी …

मुंबई : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाताच्या वादग्रस्त निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे . मुंबईतील भिवंडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्माला समन्स बजावले असून, १३ जून रोजी जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
मुंबईतील भिवंडीपोलिसांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना समन्स बजावून त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. या समन्सनुसार नुपूर शर्मा यांना १३ जून रोजी तर नवीन जिंदाल यांना २५ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनीही नुपूर शर्माला २५ जूनला तिचा जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान मुंब्रा पोलिसांनीही २२ जून रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात हजार राहण्यासंबंधी समन्स बजावले आहेत.गुफरान खान नावाच्या शिक्षकाच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नुपूर शर्मा यांच्यावर देशभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.