Aurangabad Crime Update : पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीस अटक

औरंगाबाद – प्रेमविवाह केलेल्या बायकोच्या डोक्यात खलबत्ता घालून खून करंत घराला कुलुप लावून फरार झालेला आरोपी सातारा पोलिसांनी मंगळवारी रात्री १२च्या सुमारास. नेवासापरिसरात अंधारात झडप घालून जेरबंद केला.
मच्छिंद्र पिटेकर(५५) रा. राहूलनगर सातारा परिसर असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने त्याची बायको बिलकीस उर्फ मिना पिटेकर(२५) हिचा चारित्र्यावर संशय घेत ती झोपेत असतांना खून केला. आरोपीच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला.
बायकोचा खून करुन मच्छींद्र हा त्याच्या मूळ गावी लपला होता.त्याचे नातेवाईक, मित्राकडे सातारा पोलिसांनी चौकशी केली होती. दरम्यान खबर्याने तपास करणार्या पोलिसांना माहिती दिलीकी, आरोपी मच्छींद्र पिटेकर हा त्याच्या बंद घरात कंपाऊंडवाॅलवरुनउडी मारुन घरी येत असतो.त्यानुसार पीएसआय सर्जेराव सानप ,पोलिस कर्मचारी शिंदे,धुळे यांनी प्लान करुन दोन पोलिस कर्मचारी शिंदे आणि धुळे यांना आरोपी पिटेकरच्या घरात दडवले. रात्री साडेअकरा वा.आरोपी पिटेकर हा घरात कंपाऊंडवाॅलवरुन उडी मारताच पोलिसांनी पिटेकरला जेरबंद केले.
वरील कारवाई त पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिसउपायुक्त दिपकृगिर्हे,सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ,पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सर्जेराव सानप, पोलिस कर्मचारी धुळे, शिंदे. पवार, लोंढे, मंगेश जाधव यांनी पार पाडली.