News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : धर्मगुरू दलाई लामा रुग्णालयात दाखल

1. दिल्लीः धर्मगुरू दलाई लामा रुग्णालयात दाखल
2. लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी; सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान, नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५, ईशान्य भारतात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान
3. छत्तीसगडः दंतेवाडा येथील नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदार ठार; ५ जवान शहीद
4. मुंबईः राहुल गांधी म्हणतात, गरबी हटवा याची सुरवात तुझ्या आजीबाईंनी केली होती. तुमची गरीबी हटली. पण लोकांची नाही.एकदा फसवलंत पुन्हा नका फसवू – उद्धव ठाकरे
5. पुणेः पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट, त्यांची शेपूट वाकडीच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6. पुणेः जम्मू काश्मीरमधलं ३७० कलमही हटवलंच पाहिजे – रामदास आठवले
7. पुणेः सर्व हिंदू संघ शाखेत येतील, अशी आमची कल्पना नाही. पण, आम्ही असे नेतृत्व देऊ जे सर्वांचं असे, वास्तूचा ढाचा संघाने पाडला ही गोड समजूतःलः रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी
8. अहमदनगरः बहिणीचे लग्न दिराबरोबर लावून न दिल्यामुळे पत्नीचे हत्या करणाऱ्या पती गोरक्षनाथ यादव गिते याला जन्मठेप
9. औरंगाबाद: गर्भलिंग प्रकरणातील आरोपी डॉ. सूरज सूर्यकांत राणा, गणेश प्रभाकर गोडसे, डॉ. वर्षा सरदारसिंग शेवगण, डॉ. सुनिल बाबासाहेब पोटे व राजेंद्र काशिनाथ सावंत यांचा नियमित जामीन फेटाळला
10. औरंगाबाद: भर कोर्टात व हातकडीत असलेला कुख्यात आरोपी शेख वाजेद उर्फ बबल्या शेख असद याचा पोलिसांसमोर साक्षीदारावर हल्ला व साक्ष दिल्यास जिवे मारण्याची धमकी
11. औरंगाबाद: आई-वडील कामाला गेले असल्याने लहान बहिणीला सांभाळणाऱ्या मुलीला झोपेत असताना शेजारी उचलून नेऊन बलात्कार करणारा आकाश भगवान ससाणे यास ३ वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंड
12. नागपूरः गेल्यावेळेपेक्षा अधिक मत फरकाने निवडणूक जिंकेन – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना १०० टक्के विश्वास
13. कोल्हापूरः वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहिरनामा प्रसिद्ध
14. उत्तर प्रदेश: प्रियांका गांधी यांच्या सहारनपूरमधील रोड शोला मोठा प्रतिसाद.
15. नाशिक: अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणली १० हजार रुपयांची सुटी नाणी.
16. नवी दिल्ली: जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकणार नाही- गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, खासदार फारुक अब्दुल्ला यांना उत्तर.
17. नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता दाखल केला उमेदवारी अर्ज; शेतकरी कुटुंब होते सोबत.
18. लातूर: काँग्रेसचे ‘ढकोसलापत्र’ स्वार्थासाठी, तर आमचे ‘संकल्प पत्र’ देशाच्या विकासासाठी- पंतप्रधान मोदी यांची निवडणूक जाहीरनाम्यासंदर्भात काँग्रेसवर टीका.
19. मुंबई – पाच वर्षांत काहीच विकास साध्य न केल्यामुळे त्यांच्याकडे बाेलण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे मोदींनी घेतला हिंदुत्वाचा आधार, शरद पवार यांची टीका
20. नागपूर – संघाच्या कर्मभूमीतून व दिक्षाभूमीतून भाजपची विजययात्रा सुरुवात होईल – अमित शहा
21. गुजरातमधील प्रमुख पक्षांच्या ५० टक्के उमेदवारांकडे नाही पदवी
22. गडचिरोली : काँग्रेसचे प्रचार साहित्य असलेल्या वाहनातून पाच लाखांची रोकड जप्त
23. राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय देणार निकाल