AurangabadCrimeUpdate : औरंगाबादेत तरुणीचा खून

औरंगाबाद – नारेगाव परिसरातील राजेंद्र नगर मधे तरुणीचा डोक्यावर जबर मारहाण करुन गळा आवळून खून करण्यात आला.या प्रकरणी अज्ञात इसमा विरुध्द सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हादाखल झाला आहे.
रेणूका देविदास ढेपे (२०) असे मयत तरुणीचे नाव आहे. तिचा मावसभाऊ योगेश नवतूरे रा.ब्रीजवाडी याच्यााफिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. संध्याकाळी ७ च्या सुमारास खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणीपुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे करंत आहेत.