AurangabadCrimeUpdate : भागीदारावर जीवघेणा हल्ला करंत ४ लाखांचा ऐवज घेऊन आरोपी फरार

औरंगाबाद – भागीदारामधे रविवारी पहाटे ५वा. मोंढ्यामधे वाद झाल्यानंतर चाकु हल्ला करत भागीदाराला रस्त्यात सोडून अडीच लाख रुपये रोख रौख व दीड लाख रुपये किमतीची कार घेऊन आरोपी पसार झाला.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करंत लुटमार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.क्रांतीचौक पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी शहराबाहेर रवाना झाले आहे.
शेख मोईनोद्दीन शेख अहेमनोद्दीन(३०) रा. शुलीभंजन खुलताबाद असे जखमीचे नाव आहे. तर अरबाजबेग नौशादबेग रा.फकीरवाडा खुलताबाद असे फरार आरोपीचे नाव आहे. वरील दोन्ही इसम खुलताबादेत भागीदारीमधे सुक्या खोबर्याचा व्यवसाय करतात.
रविवारी पहाटे ५वा.मोंढ्यात खुलताबादेहून दोघे जाफरगेट परिसरात आले.त्या ठिकाणी दोघांमधे व्यावसायिक वाद झाले. त्यामुळे चिडलेल्या अरबाज बेग ने शेख मोईनोद्दीन ला कार बाहेर काढंत छातीवर चाकुचे तीन वार केले. यामुळे मोईन खाली कोसळताच आरोपी अरबाज बेग दीड लाख रुपये किमतीची स्वीफ्ट कार व खोबरे खरेदीसाठी लागणारे अडीच लाख रुएए घेऊन पसार झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल सोनवणे करंत आहेत