IndiaCourtNewsUpdate : पाच वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात अल्पसंख्यांक न्यायमुर्तींची नियुक्ती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाला दोन नवीन न्यायाधीश मिळाले आहेत. नावांची शिफारस केल्यानंतर ४८ तासांच्या आत केंद्राने नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशू धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमशेद बी पार्डीवाला यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ५ मे रोजी सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने दोन नवीन न्यायाधीशांची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली होती. मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील SC कॉलेजियमने सुधांशू धुलिया आणि जमशेद बी पार्डीवाला यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याच्या शिफारशीवर निर्णय घेतला. विशेष म्हणजे पाच वर्षांनंतर अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तींची नियुक्ती झाली आहे.